उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील पेरांबूर रेल्वे स्थानकाजवळील रूळावर एलपीजी गॅस सिलिंडर सापडला. लोको पायलटने वेळेत ब्रेक लावत दाखवलेल्या सावधानतेमुळे मोठी दुर्घटना थोडक्यात टळली.
भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ऑगस्टपासून देशभरात रेल्वे रूळावरून घसरण्याचे 18 वेळा प्रयत्न झाले आहेत. जून 2023 पासून सप्टेंबर 2024 पर्यंत 24 वेळा अशा घटना घडल्या आहेत. LPG सिलिंडर, सायकल, लोखंडी रॉड, सिमेंट ब्लॉक यांसारख्या वस्तू रूळावर ठेवून अपघात घडवण्याचे अनेक प्रकार घडले आहेत.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, 18 घटनांपैकी 15 घटना ऑगस्टमध्ये आणि चार घटना सप्टेंबरमध्ये घडल्या आहेत. ज्यामध्ये कानपूरमधील घटनेचा देखील समावेश आहे.