खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीतून विविध कारखान्यांमधील सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता कोतवली येथे खाडीत सोडण्यात येते. त्यामुळे खाडीपात्रातील किंबहुना नदीपात्रातील माशांच्या प्रजातीला मोठा धोका निर्माण झाला आहे. गेल्या काही वर्षांत झपाटय़ाने माशांची प्रजाती कमी होत चालली असून याला कारणीभूत जलप्रदूषण हाच घटक ठरत आहे.
लोटे एमआयडीसीमधील अनेक पंपन्या सीईटीपी प्रकल्प कार्यान्वित असतानादेखील सांडपाणी परस्पर खाडीत सोडत असल्याने असंख्य दुर्मीळ प्रजाती नष्ट होण्याच्या उंबरठय़ावर येऊन ठेपल्या आहेत. माशांची प्रजाती कमी होत चालल्याने मासेमारी व्यवसायावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा भोई समाज त्याचबरोबर काही अंशी असलेला गोपाळ समाजदेखील झपाटय़ाने कमी होणाऱया माशांमुळे आर्थिक संकटात सापडला आहे.