तारुण्यासाठी आई वापरणार मुलाचे रक्त

आई मुलांसाठी रक्ताचे पाणी करते पण, लॉस एंजेलोसमधील 47 वर्षीय स्वघोषित ह्यूमन बार्बीने ब्लड ट्रान्सफ्यूजनसाठी स्वतःच्या मुलाचे रक्त वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. परंतु, यात काहीही वावगे नसल्याचे ती म्हणत असून तिचा मुलगा रोड्रिगो स्वतःहून रक्त द्यायला तयार झाल्याचे तिने म्हटले आहे. ब्लड ट्रान्सफ्यूजनमध्ये रक्तातील प्लाझ्मा प्रोटीन, लाल रक्त पेशी, ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी नवे रक्त चढवले जाते. त्यासाठी सुदृढ तरुणाचे रक्त वापरले जाते. ही प्रक्रिया 4 ते 5 तासांची असते.