अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे आगीने थैमान घातले आहे. मंगळवारपासून सुरू झालेल्या आगीमध्ये जवळपास 40,000 एकर परिसर कचाट्याच सापडला आहे. लाखो लोकांचे संसार आगीमुळे उद्ध्वस्त झाले आहेत. या आगीच्या कचाट्यात अमेरिकेचा महान जलतरणपटू गॅरी हॉल ज्युनिअर (Gary Hall Jr.) याचे घर सुद्दा भस्मसाथ झाले आहे. घरासोबत त्याने देशासाठी जिंकलेल्या सूवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकांची राख झाली आहे.
अमेरिकेच्या महान जलतरणपटूंमध्ये गॅरी हॉल ज्युनिअर यांचा समावेश आहे. आगीच्या भक्षस्थानी आल्यामुळे त्यांना आपले पॅसिफिक पॅलिसेड्समधील घर सोडावं लागले आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे या आगीमध्ये त्यांची एकून 12 पदके जळून खाक झाली आहेत. ऑलिम्पिक आणि जागतिक चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी ही पदके जिंकली होती. गॅरी यांनी ऑलिम्पिकमध्ये 5 सूवर्ण, तीन रौप्य आणि 2 कांस्य पदके जिंकली होती. तसेच 2000 आणि 2004 साली ऑलिम्पिक खेळांमध्ये पुरषांच्या 50 मीटर फ्रीस्टाईलमध्ये त्यांनी 2 सूवर्णपदके जिंकली होती. परंतु आगीने रौद्ररुप धारण केल्यामुळे त्यांची 10 ऑलिम्पिक पदके आणि वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये जिंकेलेली दोन पदके जळून खाक झाली आहेत.
आगीची तिव्रता खूपच जास्त होती. त्यामुळे सर्व गोष्टी बाहेर काढण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही. मी त्यावेळी पदकांचा विचार केला होता, परंतु तेवढा वेळ नव्हता, असे गॅरी यांनी सांगितले आहे. या आगीमध्ये त्यांचा स्विमींग पूल सुद्धा पूर्णपणे नष्ट झाला आहे. याच स्विमींग पूलमध्ये ते खेळाडूंना प्रशिक्षण देत होते.