आपला चेहरा हा व्यक्तिमत्वाचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. परंतु वाढत्या वयाबरोबर आपल्या चेहऱ्याची त्वचा देखील निस्तेज होते. आपल्यापैकी अनेकांना वयापेक्षा तरुण दिसण्याची इच्छा असते. अशावेळी मग सौंदर्यप्रसाधनांकडे वळण्याचा कल असतो. परंतु सौंदर्यप्रसाधनांपेक्षा आहारामध्येच आपण योग्य बदल केले तर, आपली त्वचा तरुण राहण्यास मदत होईल. आपल्या रोजच्या आहारामध्ये असे कोणते पदार्थ समाविष्ट करायला हवेत ज्यामुळे आपण निरोगी आणि तरुण दिसू.
ब्रोकोली
Photo Courtsey- Canva.com
ब्रोकोलीमध्ये दाहक-विरोधी आणि वृद्धत्वविरोधी गुणधर्म मुबलक प्रमाणात आढळतात. याशिवाय, त्यात व्हिटॅमिन सी आणि के देखील आढळते. यामुळे शरीरात कोलेजनचे उत्पादन वाढू शकते. तुम्ही ब्रोकोली कच्ची किंवा वाफवून खाऊ शकता. ही त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे.
एवोकॅडो
त्वचा तरुण ठेवण्यासाठी एव्होकॅडोचे सेवन देखील उत्तम पर्याय आहे. त्यात अनेक पोषक घटक आढळतात, यामुळे त्वचा तरुण राहण्यास मदत होते. यामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स भरपूर प्रमाणात असतात. या पोषक घटकांमुळे आपली त्वचा तरुण राहते. तसेच एवोकॅडोमध्ये जीवनसत्त्वे अ, ब, क, ई देखील आढळतात, यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक देखील येते.
सुका मेवा
सुक्या मेव्याचे सेवन केल्याने, प्रथिने, व्हिटॅमिन ई, आवश्यक खनिजे असे अनेक पोषक घटक आढळतात. बदाम आणि अक्रोड बद्दल बोलायचे झाले तर, त्यामध्ये व्हिटॅमिन ई आढळते, जे त्वचेला अतिनील किरणांपासून वाचवण्यास मदत करू शकते. याशिवाय, व्हिटॅमिन ई त्वचेला चमकदार ठेवण्यास मदत करते.