‘ती’ वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची नाहीत? लंडनच्या म्युझियमने दिले ‘हे’ स्पष्टिकरण

स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा कोथळा ज्या वाघनखांनी काढला ती वाघनखं लंडनच्या ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट’ या संग्रहालयातून हिंदुस्थानात आणणार असल्याचा दावा राज्यातील मिंधे सरकारने केला होता. त्यासाठी राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार हे लंडनला देखील जाणार आहेत.

मात्र ही वाघनखं नक्की छत्रपती महाराजांचीच आहेत का? अफजलखानाचा वध करताना महाराजांनी हिच वाघनखं वापरलेली का? याबाबत साशंकता असल्याचे लंडनच्या संग्रहालयाकडून सांगण्यात आले आहे. इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना लंडनच्या म्युझियमचे अध्यक्ष डॉ. हंट यांनी पत्र पाठवले आहे. त्या पत्रातून हंट यांनी ती वाघनखं महाराजांनी वापरलेली आहेत की नाही याबाबत अनिश्चितता असल्याचे स्पष्टिकरण दिले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी 1659मध्ये प्रतापगडाच्या पायथ्याशी विजापूरचा सरदार अफझलखान याचा ज्या वाघनखांनी कोथळा काढला होता. ती वाघनखे ‘व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट’ या संग्रहालयात असून ती हिंदुस्थानात आणणार असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले होते.