हवामान बदलाचे स्त्रियांवर होणारे परिणाम रोखण्यासाठी निवडणूक लोकराज्य सनद

महाराष्ट्रातील शहरांसह ग्रामीण भागात हवामान बदलामुळे स्त्रीयांच्या आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम रोखण्यासाठी विधानसभा निवडणूक 2024साठी ‘लोकराज्य सनद’ प्रकाशित करण्यात आली आहे. ‘बाईमाणूस’ आणि रिसोर्स अँड सपोर्ट सेंटर फॉर डेव्हलपमेंट’ (आरएससीडी)कडून आज सर्वच राजकीय पक्ष आणि राजकीय नेत्यांसाठी लोकराज्य सनद प्रकाशित करण्यात आली.

महाराष्ट्रात वाढते प्रदूषण आणि हवामान बदलामुळे विशेषतः स्त्रीया आणि दिव्यांगांना अनेक शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. ग्रामीण भागात विशेषतः हे प्रमाण सर्वाधिक आढळून येते. त्यामुळे स्त्र्ायांच्या थेट शरीरावर परिणाम होणाऱ्या गोष्टींकडे राज्यकर्त्यांकडून दुर्लक्ष केले जाऊ नये अशी अपेक्षा दोन्ही संघटनांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे लोकराज्य सनद प्रकाशित करून मागण्या मांडण्यात आल्या आहेत. दोन्ही संस्थांकडून राज्यभरात सर्वेक्षण स्त्रीया, दिव्यांगांची स्थिती जाणून घेतल्यानंतरच या मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी ठाण्यातील किसल ग्रामपंचायतीच्या सरपंच डॉ. कविता वरे, आरएससीडीचे संचालक भीम रासकर, अप्सरा अगा उपस्थित होते.

अशा आहेत प्रमुख मागण्या

z महिलांना स्थानिक आणि राज्यस्तरीय हवामान मंडळे व निर्णय घेणाऱ्या समित्यांमध्ये  नियोजनामध्ये संधी मिळावी. z अन्न, पाणी आणि स्वच्छतेसंदर्भात महिलांच्या समस्या जाणून घेऊन हवामान संकटांचा सामना करण्यासाठी उपाय करावेत. z असंघटित क्षेत्रातील हवामान व आपत्ती प्रतिरोधक असणारी घरकुल रचना आणि आर्थिक संरक्षण देण्यात यावे. z ऊर्जा संक्रमणामुळे प्रभावित होणाऱ्या महिला समुदायाच्या समस्या  जाणून त्यांच्यासाठी काwशल्य विकास प्रशिक्षण व उपक्रमांची आखणी करावी. z महाराष्ट्र राज्य हवामान सेलच्या अंतर्गत ‘लिंग आणि हवामान कार्यगटा’ची स्थापना करून स्त्री-पुरुष समानता आधारित अंमलबजावणी करावी.