धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गाच्या भूसंपादनात शेतकऱ्यांवर मोठा अन्याय – ओमप्रकाश राजे निंबाळकर

संसदेचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान रेल्वे संशोधन विधेयकावर चर्चा करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गाच्या भूसंपदानाबाबत सवाल उपस्थित करत शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाकडे रेल्वेमंत्र्यांचे लक्ष वेधेले.

रेल्वे संशोधन विधेयकावर चर्चा करताना ओमप्रकाश राजे निंबाळकर म्हणाले की, आज लोकसभेत धाराशिव- तुळजापूर -सोलापूर या नवीन रेल्वे मार्गात भूसंपादन होणाऱ्या शेतकऱ्यांना जमिनीचा पाचपटीने मोबदला देऊन शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करावा अशी आज रेल्वे संशोधन विधेयकावर चर्चा करताना मागणी केली की, धाराशिव-तुळजापूर-सोलापूर हा नवा रेल्वेमार्ग करण्यात येत आहे. या मार्गाची सुरुवातील घोषणा झाली तेव्हा थेट जमीन खरेदीद्वारे प्रकल्प करण्यात येणार होता. मात्र, 2022 मध्ये त्यात बदल करत सक्तीच्या भूसंपदानातून हा प्रकल्प केला जाणार आहे. थेट खरेदीद्वारे भूसंपादन झाले असते तर धाराशिव, तिळजापूर मतदारसंघातील शेतकऱ्यांना फायदा झाला असता. त्यांना पाचपट मोबदला मिळाला असता. मात्र, आता सक्तीने भूसंपदान होणार असल्याने रेडी रेकनरच्या दराप्रमाणे मोबदला मिळत आहे. राज्यात जेवढे रेल्वेप्रकल्प झाले ते थेट खरेदीद्वारे वाटाघाटीद्वारे झाले. मात्र, राज्यातील आकांक्षित जिल्ह्यात आणि सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असलेल्या जिल्ह्यात अशाप्रकारे सक्तीचे भूसंपादन होत असल्याने आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे, या गोष्टीकडे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी रेल्वेमंत्र्यांचे लक्ष वेधले.