35 हजार मते अधिक मोजल्याचा एडीआरचा दावा; लोकसभा निवडणूक निकालावर पुन्हा प्रश्नचिन्ह

लोकसभा निवडणुकीत भाजपला अनेक ठिकाणी अपयशाचा सामना करावा लागला. आधीच मोदींविरोधी हवा असल्याने भाजप नेत्यांचे, उमेदवारांचे धाबे दणाणले असताना निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी केलेले कारनामे उजेडात आले. आता पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक निकालावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकूण मतदानापैकी 35 हजार मते अधिकची मोजली गेल्याचा खळबळजनक दावा एडीआर अर्थात असोसिएशन फॉर डेमोव्रेटिक रिफॉर्म्सने केला आहे.

लोकसभा निवडणुकीत 362 लोकसभा मतदारसंघात एकूण 5 लाख 54 हजार 598 मते कमी मोजली गेली तर 176 मतदारसंघ असे आहेत जिथे एकूण मतदानापैकी 35 हजार मते अधिक मोजली गेली. या रिपोर्टवर निवडणूक आयोगाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. एडीआरचे संस्थापक जगदीप छोकर यांनी पत्रकार परिषदेत एडीआरच्या अहवालातील आकडेवारी मांडली. अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्यामुळे निवडणूक निकालावर संशय निर्माण होतो असे त्यांनी सांगितले.

हे प्रश्न अनुत्तरित
अंतिम मतदानाची आकडेवारी जारी करण्यास विलंब का?
निवडणुकीचा निकाल अंतिम मतांच्या डेटावर घोषित केले होते का?
मतमोजणीची अंतिम आणि अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यापूर्वी निवडणूक निकाल का जाहीर केला नाही?

– ईव्हीएममधील मते, मोजणीतील तफावत, अंतिम मतदानाच्या टक्केवारीत झालेली वाढ, यासंदर्भात निवडणूक आयोगाकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नसल्याचे एडीआरच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.