लोकसभा निवडणूक निकालानंतर नरेंद्र मोदी आणि भाजपच्या 400 पार नाऱयाचा फुगा फुटला. भाजपला स्वबळवर बहुमताचा 272चा आकडाही पार करता आला नाही. घटक पक्षांना सोबत घेऊन आता एनडीए सरकार बनत आहे आणि मोदी तिसऱयांदा पंतप्रधान होतील. या सर्व घडामोडींची जागतिक वृत्तपत्रांनी दखल घेतली असून, ‘मोदींनी संसदीय बहुमत गमावले आहे. नरेंद्र मोदींभोवती जे अजिंक्यतेचं आभाळ उभं केलं होतं ते कोसळलं’, असे मत या वृत्तपत्रांनी मांडले आहे.
काय म्हणाले जागतिक मीडिया
ब्रिटनच्या दैनिक ‘द गार्डियन’ने हिंदुस्थानच्या निवडणुकीत मोदींनी संसदीय बहुमत गमावले, असे स्पष्टपणे लिहिले आहे. भाजपने केलेली भाकिते खरी झाली नाहीत. उलट मोदी आणि त्यांच्या राजकारणाला धक्का बसला आहे. निवडणूक प्रचारादरम्यानच भाजप अस्वस्थ असल्याचे दिसत होते. त्यामुळेच कदाचित त्यांनी धार्मिक मुद्यांचे ध्रुवीकरण वाढवले. गोठवलेला पक्ष निधी, निवडणूक काळात विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकण्याच्या प्रकारामुळे इंडिया आघाडीला यशस्वी होण्यात मदत झाली याकडेही लक्ष वेधले आहे.
z अमेरिकेच्या ‘न्यूयॉर्क टाईम्स’ दैनिकाने लिहिले आहे की, ‘अचानक नरेंद्र मोदींभोवतीचं अजिंक्यतेचं आभाळ कोसळलं आहे. मोदींच्या कार्यकाळातील ही फार मोठी उलथापालथ आहे.’
z ‘द टेलीग्राफ’ने पंतप्रधान मोदींसाठी ‘बहुमताचा आश्चर्यचकीत पराभव’, असे वर्णन केले आहे.
z ‘ली मोंड’ने म्हटले आहे, मोदींनी चारसो पारचा नारा दिला होता. पण भाजपला 270ही जागा मिळाल्या नाहीत. त्यांनी 200वर सभा घेतल्या. तरीही त्यांची जादू चालली नाही.
z अमेरिकेच्या ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ दैनिकाने ‘पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचे अनपेक्षित खंडन’, असे म्हटले आहे. या निकालाने दशकातील प्रबळ हिंदुस्थानी नेत्याच्या अजिंक्यतेवर प्रश्न निर्माण केल्याचे नमूद केले आहे.