Lok Sabha Election Result 2024 :मोदींच्या हुकूमशाही मानसिकतेमुळे भाजप खड्ड्यात, सुब्रम्हण्यम स्वामी यांची पोस्ट चर्चेत

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु असताना 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपला मोठा धक्का बसला आहे, अशातच भाजप नेते सुब्रम्ह्यणम स्वामी यांनी केलेली सूचक पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनली आहे. मोदींच्या हुकूमशाही मानसिकतेमुळे भाजप खड्ड्यात गेली आहे, ज्यातून पक्षाला बाहेर पडावं लागले अशी झोंबणारी प्रतिक्रिया सोशल मीडिया साईट एक्सवर त्यांनी शेअर केली आहे.

सुब्रम्हण्यम स्वामी यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात ते म्हणाले, भाजप कमीतकमी 220 जागा जिंकेल असा अंदाज मी वर्तवला होता, तो आता समोर आलेल्या 237 च्या जवळपास जाणारा आहे. भाजपने जर माझा सल्ला ऐकला असता तर त्यांना 300 चा आकडा गाठता आला असता. मात्र दुर्देवाने नरेंद्र मोदी यांच्या हुकूमशाही मानसिकतेमुळे भाजप खड्ड्यात गेला आहे, आता त्यातून पक्षाला बाहेर पडावं लागेल”. अशी पोस्ट शेअर केली आहे.