राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटून बाहेर पडून पक्ष आणि चिन्ह पळवणाऱ्या अजित पवार गटाला लोकसभा निवडणुकीत जरदस्त पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं 8 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. ज्यामुळे शरद पवार यांच्या नेतृत्त्वातील पक्षच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं जनतेनं दाखवून दिल्याचं बोललं जात आहे.
या निकालानंतर आता अजित पवार यांच्या गटात असलेल्या आमदारांना चिंता लागली आहे ती विधानसभेची आणि त्यांनी पुन्हा शरद पवारांच्या नेतृत्त्वातील राष्ट्रवादीत परत जाण्याचा मानस बनवला आहे अशी चर्चा आहे.
यापार्श्वभूमीवर अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांची भेट घेतली आहे. गुरुवारी त्यांनी आपल्या गटातील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. त्यांचे 10-15 आमदार शरद पवारांच्या संपर्कात असण्याची शक्यता आहे, इंडिया टुडेनं सूत्रांच्या हवाल्यानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. यामुळे अजित पवार गटात वातावरण तंग आहे.