लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहे. यात मुंबईतील प्रतिष्ठेच्या असलेल्या सहा जागांवर चुरशीची लढत होत आहे. दक्षिण मध्य मुंबईत महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अनिल देसाई यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांची लढत शिंदे गटाच्या राहुल शेवाळे यांच्याही होती. या लढतीत देसाई यांनी शेवाळेंना चितपट करत मोठा विजय मिळवला आहे.
ही जागा महाविकास आघाडी आणि महायुतीसाठी महत्त्वाची होती. जनतेने महाविकास आघाडी आणि शिवसेनेच्या बाजूने कौल देत या मतदारसंघात गद्दाराला गाडले आहे, अशी भावना व्यक्त होत आहे. अनिल देसाई यांना 3,95,138 मते मिळाली. त्यांनी तब्बल 53,384 इतकं मताधिक्य मिळवत आपला विजय निश्चित केला. या मतदारसंघात देसाई यांचा विजय झाल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांना मुंबईतील आणखी एक जागा मिळाली आहे.