लोकशाहीतील मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यासाठी एक 87 वर्षांची वयोवृद्ध महिला मतदार स्पूटरवर बसून मतदान केंद्रावर आली, तर मुंबईतील एक तरुण मतदार मतदान करण्यासाठी थेट दुबईतून मुंबईत आल्याचे चित्र आज दक्षिण मध्य मुंबईत पाहायला मिळाले. रणरणते उन, घामाच्या धारा, मतदान केंद्रातील असुविधा असे चित्र असले तरी मतदानाचा हक्क बजावल्याचा आनंद मतदारांच्या चेहऱयावर होता.
माटुंगा (प) स्टेशनसमोरील कस्तुरबा महिला मंडळातील मतदान केंद्रात मतदान सुमारे 28 मिनिटे विलबांने सुरू झाल्याचा आरोप आशिष जानी यांनी केला. ते म्हणाले, मी आणि माझी पत्नी ठीक सकाळी सात वाजता या केंद्रावर मतदानासाठी आलो, पण ईव्हीएम मशीन सकाळी 7 वाजून 28 मिनिटांनी सुरू झाले.
पहिल्या मतदानाचा आनंद
माहीममधील साबिद अन्सारी या तरुणाने प्रथमच मतदानाचा हक्क बजावला. पहिल्या मतदानाचा आनंद त्याच्या चेहऱयावर मावत नव्हता. तर्जनी उंचावून साबिदने सेल्फी काढला आणि समाजमाध्यमावर टाकला. घरच्यांना पह्न करून आपण मतदान केल्याचे सांगत होता.
मोबाईल आणि ओळखपत्र
मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास बंदी होती, पण तरीही अनेक मतदार पेंद्रांमध्ये मोबाईल घेऊन आले होते. त्यांना मोबाईल बाहेर नेण्यास सांगितल्यामुळे मतदान कर्मचारी आणि मतदारांमध्ये खटके उडत होते. अनेक मतदार मोबाईलच्या ‘डिजीलॉकर’मधील ओळखपत्र किंवा मोबाईलवर काढलेल्या ओळखपत्राचा पह्टो दाखवत होते, पण मोबाईलचा पह्टो ग्राह्य धरला जात नव्हता.
स्कूटरवरून मतदानाला
धारावीतील कामराज नगर शाळेतील मतदान केंद्रात शुगला बीबी या 87 वर्षांच्या ज्येष्ठ महिला नातवाच्या स्पूटरवर बसून मतदानासाठी आल्या होत्या. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर तर्जनी उंचावून दाखवली आणि मतदानाचा हक्क बजावल्याचे सांगितले. वय झाले असले तरी रणरणत्या उन्हाची पर्वा न करता स्पूटरवर बसून आले.
दुबईतून थेट मुंबईत
लोकसभा निवडणुकीत मतदान करण्यासाठी शिवाजी पार्पमधील रहिवासी हरी अग्निहोत्री हे दुबईतून खास मतदान करण्यासाठी मुंबईत आले. पेशाने इंजिनीयर असलेले हरी अग्निहोत्री नोकरीनिमित्त गेल्या अनेक वर्षांपासून दुबईत वास्तव्याला आहेत. यंदा खास मतदान करण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली. सूर्यवंशी हॉलमध्ये मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मतदानाविषयी त्यांच्याकडून जाणून घेतले असता, हातात मशाल धरण्यासाठी मी मुंबईत आलो आहे. लोकशाहीतील पवित्र कर्तव्य पार पाडण्यासाठी मुंबईत आलो. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर आता पुन्हा मी दुबईला रवाना होणार आहे असे सांगितले.