तुमच्या सोयीसाठी इंग्रजीत एक संदेश पाठवत आहे; निलेश लंके यांचा सुजय विखेंना टोला

sujay-vikhe-patil-nilesh-lanke

Lok Sabha Election 2024 :

नगर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीकडून लढणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांनी भाजप खासदार सुजय विखे पाटील यांना सणसणीत टोला लगावला आहे. निलेश लंके यांनी ट्विट करत सुजय विखे पाटील यांचा इंग्रजीवरून समाचार घेतला आहे. मेहनतीच्या जोरावर पैशाची मस्ती जिरवता येते, असे निलेश लंके यांनी म्हटले आहे.

Nilesh Lanke यांनी माझ्या एवढे इंग्रजीत बोलून दाखवावे. महिनाभर वेळ घेऊन पाठ करून बोलून दाखवावे. तोपर्यंत मी उमेदवारी अर्ज भरणार नाही, असे आव्हान सुजय विखे पाटील यांनी दिले. सुजय विखे यांच्या आव्हानाला निलेश लंके यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. ‘Sujay Vikhe श्रीमंत कुटुंबातील आहेत. त्यामुळे ते माझ्यासारख्या गरीब उमेदवाराची टिंगल करतील. त्यांना पैशांची मस्ती आहे’, असा जोरदार टोला निलेश लंके यांनी लगावला.

तुमच्या ‘सर्वोच्च’ नेत्याला हा प्रश्न करू नका, नाहीतर…! रोहित पवारांचा सुजय विखेंना सल्ला

‘मी एका शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्माला आलो. त्यामुळे इंग्लिश मीडियम शाळेत शिक्षण घेऊ शकलो नाही. पण समोरच्या उमेदवाराला पैशाची मस्ती आहे. आता ही निवडणूक गरीब विरुद्ध श्रीमंत अशी आहे. वैयक्ति टीका करण्यापेक्षा पाच वर्षांत काय कामं केली यावर बोला? असा सवाल उपस्थित करत निलेश लंके यांनी सुजय विखे यांना आव्हान दिले आहे.

निलेश लंके यांचे ट्विट चर्चेत

निलेश लंके आणि सुजय विखे पाटील यांच्यातील हा राजकीय वाद आता सोशल मीडियावर गेला आहे. निलेश लंके यांनी ट्विट करून सुजय विखे पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे.

“सुजयजी, तुम्हाला जनसामान्यांच्या मराठी भाषेत कळत नसल्याचे समजले. तुमच्या सोयीसाठी इंग्रजीत एक संदेश पाठवत आहे :
Hard work beats money and muscle. ” असे ट्विट निलेश लंके यांनी केले आहे. इंग्रजीवरून सोशल मीडियावर आता सुजय विखे पाटील यांच्या टीका होत आहे. सुजय विखे यांनी नरेंद्र मोदी आणि नारायण राणे यांचा इंग्लिश स्पिकिंगचा कोर्स घ्यावा, असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे.

Lok Sabha 2024 राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पाच उमेदवार जाहीर, वाचा यादी