Lok Sabha Election 2024: 30 वर्षानी जालन्यात भाजपचा गड ढासळला, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पराभूत; काँग्रेसचे कल्याण काळे विजयी

जालना मतदारसंघातून काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा दणदणीत पराभव केला आहे. गेल्या 30 वर्षांपासून जालना मतदारसंघातून निवडून येणाऱ्या दानवेंना हा मोठा धक्का आहे.

जालना हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये जालना जिल्ह्यामधील ५ व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील ३ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. यामधील सिल्लोड हा सर्वात महत्वपूर्ण मतदारसंघ आहे.

गेल्या पाच लोकसभा निवडणुकांचा निकाल

तेरावी लोकसभा १९९९-२००४ रावसाहेब दानवे पाटील भारतीय जनता पक्ष
चौदावी लोकसभा २००४-२००९ रावसाहेब दानवे पाटील भारतीय जनता पक्ष
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ रावसाहेब दानवे पाटील भारतीय जनता पक्ष
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ रावसाहेब दानवे भारतीय जनता पक्ष
सतरावी लोकसभा २०१९- रावसाहेब दानवे भारतीय जनता पक्ष