देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीने राजकीय वातावरण तापू लागले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. अशातच आता जगातील आघाडीची आणि बलाढ्य आयटी कंपनी मायक्रोसॉफ्टने हिंदुस्थानातील लोकसभा निवडणुकीबाबत एक मोठा दावा केला आहे. यावरून आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
आर्टिफिशियल इन्टेलिजन्सचा वापर करून चीन भारत, अमेरिका आणि दक्षिण कोरियातील निवडणुका प्रभावित करू शकतो, असा इशारा मायक्रोसॉफ्टने दिला आहे. तैवानमधील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत निकाल प्रभावित करण्यासाठी चीनने आर्टिफिशियल इन्टेलिजन्स (AI) चा प्रयोग करत परीक्षण केले होते. या पार्श्वभूमीवर मायक्रोसॉफ्टने हा इशारा दिला आहे. जगभरातील 64 देशांमध्ये निवडणुका होत आहे. जगातील एकूण लोकसंख्येपैकी 49 टक्के लोकसंख्या ही या 64 देशांमध्ये आहे.
400 पारचा नारा भंपक, हे मोदींना निकालानंतर कळेल; संजय राऊत यांचा घणाघात
चीन पुरस्कृत अनेक सायबर समूह उत्तर कोरियाच्या मदतीने 2024 मधील विविध देशांमधील निवडणुकांना टार्गेट करू शकतात. जनमत प्रभावित करण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून AI चा वापर करून आपल्या बाजूने जनतेचं मन वळवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असाही इशारा मायक्रोसॉफ्टने दिला आहे.
या वर्षी जगभरात अनेक देशांत सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. विशेष करून भारत, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेत निवडणुका होत आहेत. या निवडणुकांमध्ये चीन आपल्या हितासाठी AI सामग्रीची निर्मिती आणि विस्तार करेल, असे वक्तव्य मायक्रोसॉफ्टने केले आहे.
AI चा निवडणुकीला धोका?
तैवानमधील निवडणुकीत चीन पुरस्कृत एक समूह ज्याला स्टॉर्म 1376 किंवा स्पॅमोफ्लेज या नावाने ओळखलं जातं, तो विशेष करून सक्रिय होता. या समूहाने बोगस ऑडिओ समर्थन आणि मिम्मसह AI चा प्रयोग करत सामग्री प्रसारित केली होती. या मागचा हेतू हा उमेदवारांची बदनामी आणि धोरण प्रभावित करण्याचा होता. AI चा वापर करून बनावट किंवा खोटे साहित्य निर्माण केले जाऊ शकते. त्यात ‘डीपफेक’ किंवा रचलेल्या घटनांचा समावेश आहे. अशा घटना ज्या कधी घडल्याच नाहीत.
काँग्रेसच्या न्यायपत्रात 25 गॅरंटीच 30 लाख नोकऱ्या, गरीब महिलांना वर्षाला एक लाख
हिंदुस्थानात 19 एप्रिलपासून मतदान
लोकसभा निवडणुकीसाठी हिंदुस्थानात सात टप्प्यांत मतदान होणार आहे. 19 एप्रिलला पहिल्या टप्प्याचे मतदान होईल. यानंतर 26 एप्रिल, 7 मे रोजी, 13 मे रोजी, 20 मे रोजी, 25 मे रोजी आणि शेटच्या सातव्या टप्प्यातले मतदान 1 जूनला होईल. 4 जूनला मतमोजणी होऊन निकाल लागेल.