पंजाबमध्ये भाजपला भोपळा

पंजाबमधील शेतकऱयांनी भाजपला जबरदस्त झटका दिला आहे. शेतकऱयांच्या आंदोलनाकडे डोळेझाक करणाऱया पेंद्रातील मोदी सरकार आणि भाजपला लोकसभा निवडणुकीत दणका दिला आहे. पंजाबमध्ये भाजपला 2014 आणि 2019ला मोठा विजय मिळाला होता. परंतु 2024च्या निवडणुकीत भाजपला एकाही जागेवर आघाडी मिळाली नाही. पंजाबच्या एकूण 13 जागांवर 7 जागी काँग्रेसचे, 3 जागी आम आदमी पार्टी, अन्य दोन अपक्ष उमेदवार आणि एका जागेवर अकाली दलाच्या हरसिमरत काwर बादल यांना आघाडी मिळाली आहे. पंजाबमध्ये भाजपचे उमेदवार हे तिसऱया आणि चौथ्या जागेवर फेकले गेले आहेत. 2014मध्ये भाजपला एक तर 2029मध्ये दोन जागांवर विजय मिळाला होता.