Lok Sabha Election Result : बारामतीकर सुप्रिया सुळेंसोबतच, खासदारकीचा चौकार; सुनेत्रा पवार यांचा पराभव

बहिणीचा पराभव करण्यासाठी आपल्या पत्नीला तिकीट देणाऱ्या अजित पवार यांना बारामतीतील नागरिकांनी नाकारले आहे. बारामतीतील जनतेने ते सुप्रिया सुळे यांच्यासोबतच असल्याचे दाखवून दिले आहे. बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे विजयी झाल्या आहेत.

बारामतीतून तीन वेळा खासदार राहिलेल्या सुप्रिया सुळे यांना यंदा त्यांच्या घरातूनच आव्हान देण्यात आले होते. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात त्यांची भावजय सुनेत्रा पवार निवडणूक लढवत होत्या. या लढतीत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला आहे.

बारामती हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या पुणे जिल्ह्यामधील ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांच्यात थेट लढत होत आहे.

गेल्या तीन लोकसभा निवडणुकांचा निकाल

तेरावी लोकसभा १९९९-२००४ शरदचंद्र गोविंदराव पवार (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
चौदावी लोकसभा २००४-२००९ शरदचंद्र गोविंदराव पवार (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
पंधरावी लोकसभा २००९-२०१४ सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
सोळावी लोकसभा २०१४-२०१९ सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
सतरावी लोकसभा २०१९- सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार काँग्रेस पक्ष)