लोकसभा निवडणुकीत संशयास्पद विजय मिळालेले मिंधे गटाचे रवींद्र वायकर यांची खासदारकी वादात सापडली आहे. मतमोजणी पारदर्शक व कायदेशीर पद्धतीने न झाल्याने वायकर यांचा विजय हा वादग्रस्त व शंकास्पद आहे. त्यामुळे त्यांना लोकसभेत खासदारकीची शपथ देऊ नये, अशी मागणी उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेले हिंदू समाज पार्टीचे उमेदवार भरत खिमजी शाह यांनी लोकसभा सरचिटणीस उत्पलकुमार सिंग यांच्याकडे केली आहे. त्यासंदर्भात त्यांनी सिंग यांना अॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत नोटीस पाठवली आहे.
हिंदुस्थानात प्रथमच उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात ईव्हीएम मशीन मतमोजणीबाबत एफआयआर दाखल झाला आहे. त्यामुळे रवींद्र वायकर यांना आर्टिकल 99 नुसार खासदारकीची शपथ देणे म्हणजे संविधान प्रक्रिया अपवित्र करण्याची परवानगी देणे ठरेल, असे भरत शाह यांनी लोकसभा सरचिटणीसांना पाठवलेल्या नोटिसीत नमूद केले आहे. वायकर यांचा नातेवाईक मतमोजणी प्रक्रिया सुरू असलेल्या ठिकाणी मोबाईल पह्न घेऊन हजर होता. तो पह्न ईव्हीएम मशीनसोबत जोडलेला होता असा आरोप झाल्यावर पोलिसांनी एफआयआर दाखल केला. त्यासंदर्भात चौकशी सुरू आहे, याकडेही या नोटिसीत लक्ष वेधले गेले आहे.
z उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघात नेस्को सेंटर या मतमोजणी पेंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज देण्याचे मुद्दाम टाळण्यात येत आहे ही वस्तुस्थिती हेच दाखविणारी आहे की सरकारी यंत्रणा सत्य लपविण्यासाठी रवींद्र वायकर यांना एकनाथ शिंदे व पेंद्र सरकार मदत करीत आहे, असेही भरत शाह यांनी नमूद केले आहे. उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशाराही शाह यांनी दिला आहे.