राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना मतदारसंघातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. महाजन जळगाव जिह्यातील लिहा तांडा गावात गेले होते. जामनेर मतदारसंघातील तरुणांनी गलिच्छ रस्त्यांबाबत रोष व्यक्त महाजन यांना जाब विचारला, सोशल मीडियावर यासंदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाल्याने विकासाच्या गप्पा मारणाऱया मिंधे आणि भाजपच्या दाव्यांची पोलखोल झाली आहे.
जामनेर तालुक्यातील लिहा तांडा येथे भंडाऱयानिमित्त महाजन आले असता गेल्या 30 वर्षापासून आम्ही तुम्हाला निवडून देत आहोत तरी आमच्या गावातील रस्त्यांची अशी दुरवस्था का? जाब गावातील तरुणांनी विचारला. ग्रामस्थांच्या प्रश्नाचे उत्तर न देता महाजन यांनी तेथून पळ काढल्याचा दावा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
महाजन यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर झाल्याने राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान महाजन यांनी या परिसरात पाऊस झाल्याने काही ठिकाणी चिखल झाला आहे. आपण दुचाकी वरून जात असताना त्याचा व्हिडीओ काढला असेल. गाव परिसरात असलेल्या समस्या जाणून घेण्यासाठीच आपण या गावात आज सायंकाळच्या सुमारास गेलो होतो, असं म्हटलं आहे.