श्रीवर्धन येथील 72 वर्षीय रामदास खखैरे यांच्या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले आहे. खैरे यांना जेवणातून प्रथम कीटकनाशक खायला घातले. त्यानंतर शस्त्राने वार करून त्यांची हत्या करण्यात आली. खैरे यांची हत्या ही ‘लिव्ह इन’ मधून झाल्याचे उघडकीस आले आहे.
बँकेतून सेवानिवृत्त झालेले रामदास खैरे यांची दोन लग्नं झाली होती. मात्र दोन्ही पत्नींचे निधन नवऱ्यासोबत केला हत्येचा प्लॅन मुंबई, ठाण्यातून दोन महिलेबरोबर लग्न ठरवले. परंतु आरोपींना बेड्या झाल्याने त्यांनी कविता नावाच्या हे लग्न होऊ शकले नाही. कविताने तिच्या आरती (नाव बदलले आहे) नावाच्या मैत्रिणीला रामदास खैरे यांचा मोबाईल नंबर देऊन संपर्क साधण्यास सांगितले. आरतीने खैरे यांना लुटण्याचा पूर्ण प्लॅन तयार केला. त्यानुसार ती त्यांच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहू लागली. एके दिवशी आरतीने दागिने तसेच काही रक्कम घेऊन पोबारा केला. चोरलेले पैसे व दागिने परत मिळावेत यासाठी खैरेंनी आरतीकडे तगादा लावला होता.
खैरे यांना लुटून पुण्यात निसटलेल्या आरतीने हर्षल कचर अंकुश याच्यासोबत लग्न केले. खैरे हे आपल्याला ब्लॅकमेल करीत असल्याचे तिने आपला पती हर्षल याला पद्धतशीरपणे पटवून सांगितले. यानंतर या दोघांनी खैरे यांचा काटा काढण्याचा प्लॅन केला. यासाठी आरती 11 नोव्हेंबर रोजी पुन्हा खैरे यांच्याकडे राहण्यास आली. हर्षल याने तिला श्रीवर्धन येथे सोडून तो पुन्हा मुंबईत गेला. त्यानंतर 18 नोव्हेंबर रोजी हर्षल पुन्हा श्रीवर्धन येथे आला. 22 नोव्हेंबरपर्यंत हर्षल श्रीवर्धन येथे एका हॉटेलमध्ये थांबला होता. यादरम्यान आरतीने खैरे यांना जेवणातून कीटकनाशक घातले. खैरे बेशुद्ध होताच आरती व हर्षलने धारदार शस्त्राने त्यांची हत्या केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दोन पथके तयार करून आरोपींना मुंबई व ठाणे येथून अटक केली.