
देशातील तिसरी ‘अमृत भारत’ स्लीपर ट्रेन बिहारच्या सहरसा ते लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) दरम्यान आठवडय़ातून एकदा धावणार आहे. ही ट्रेन रविवारी सहरसा येथून सुटेल आणि दुसऱया दिवशी म्हणजे सोमवारी मुंबईला पोहोचेल. प्रवासात ही ट्रेन उत्तर प्रदेशच्या दीनदयाल उपाध्याय जंक्शनवर थांबेल. ट्रेनच्या प्रवासात प्रवाशांना लिट्टी चोखा या डीशचा आस्वाद घेता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 एप्रिल रोजी ‘अमृत भारत’ स्लीपर ट्रेनला सहरसा येथे हिरवा झेंडा दाखवणार आहेत. खानपान सेवेची जबाबदारी आयआरसीटीसीकडे देण्यात आली आहे. ट्रेनमधील मेन्यूमध्ये लिट्टी चोखादेखील ठेवण्यात आला आहे.’’
सहरसा-एलटीटी ‘अमृत भारत’ ट्रेन प्रत्येक रविवारी सहरसा येथून पहाटे 3.50 वाजता सुटेल. त्यानंतर खगडिया, मुजफ्फरपूर, पाटलीपुत्र, दानापूर, आरा, बक्सरमार्गे दुपारी 3 वाजता दीनदयाल उपाध्याय जंक्शन येथे पोहोचेल.
या ट्रेनमध्ये अत्याधुनिक सुविधा आहेत. प्रत्येक डब्यात लायटिंगीची विशेष व्यवस्था आहे. नाश्त्यासाठी पह्ल्ड करता येतील असे टेबल, मोबाईल चार्ंजगची सुविधा, दिव्यांगांसाठी स्पेशल टॉयलेट आहेत.