साताऱ्यात तीन छाप्यांत पाच लाखांची दारू जप्त

विधानसभा निकडणुकीच्या पार्श्वभूमीकर जिल्हा पोलीस दलाने तीन ठिकाणी अवैध दारू काहतूक करणाऱ्यांना पकडले. त्यांच्याकडून पाच लाखांहून अधिक अवैध दारूसाठा पोलिसांनी जप्त केला.

निकडणुकीच्या पार्श्वभूमीवर निकडणूक आयोगाने चेकनाक्यांची संख्या वाढविली आहे. या ठिकाणी सर्व वाहने तपासली जात असल्यामुळे वाहनांमधून वाहतूक केली जात असलेली दारू आणि रोकड पकडली जात आहे.

सातारा तालुक्यातील कनकासकाडी येथे अवैधरीत्या दारूविक्री करणाऱ्या अजय विजय सावंत (वय 24, रा. खोकडवाडी, ता. सातारा) याच्यावर रात्री 11 वाजता पोलीस कॉन्स्टेबल सचिन रिटे यांनी कारवाई केली. त्याच्याकडे पाच लाख 6 हजार 860 रुपयांची दारू सापडली. त्याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

दुसऱ्या घटनेत, सातारा तालुक्यातील कण्हेर गावच्या हद्दीत वाघजाईनगर एसटी स्टॉपच्या आडोशाला अर्जुन रामचंद्र तुपे (वय 61, रा. कण्हेर) हा अवैधरीत्या दारूविक्री करत असताना कॉन्स्टेबल धीरज पारडे यांनी कारवाई केली. सायंकाळी 6 वाजता ही कारवाई केली असून, त्याच्याकडून 2 हजार 400 रुपयांचा माल जप्त केला. सातारा तालुका ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

आकाशवाणी केंद्र येथील एका ठिकाणी विशाल बाळू चौगुले (वय 39, रा. मंगळवार पेठ, सातारा) हा अवैधरीत्या दारूविक्री करत होता. त्याच्याकडे 3 हजार 570 रुपयांचा माल सापडला असून, त्याच्यावर शाहूपुरी ठाण्यात गुन्हा दाखल झाला.