ऐन निवडणुकीत कोल्हापुरात दारूचा महापूर आला असून कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणने 7 लाख 40 हजार 880 रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे. अवैध दारूची विक्री आणि वाहतूक तसेच साठा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी वेगवेगळी पथके तयार केली आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेला पार्ले गावच्या हद्दीत जुवाव सालदाना यांच्या मालकीच्या पत्र्याच्या शेडच्या बाजूला उघडयावर गोवा बनावटीच्या दारुचा साठा करण्यात आल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. यानंतर पथकाने पार्लेतच छापेमारी केली. या कारवाईत शिवाजी धाकलू गावडे (38) याच्याकडे जवळपास साडेसात लाख किंमतीची गोवा बनावटीची दारु मिळून आली. अधिक चौकशीत आरोपीने ही दारू महाराष्ट्राचा कर चुकविण्यासाठी गोव्यातून विक्रीकरता आणल्याची कबूली दिली.