पुणे – मुंबई अंतर अर्ध्या तासाने कमी होणार!

पुण्यावरून मुंबई गाठण्यासाठी लागणाऱ्या वेळात किमान अर्ध्या तासाचा फरक पडणार आहे. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील लिंक रोडचे काम जवळपास 90 टक्के पूर्ण झाले असून पावसाळ्याआधी 100 टक्के काम पूर्ण होणार आहे. लिंक रोडमध्ये दोन बोगदे आणि दोन पुलांचा समावेश आहे. 2 पूल आणि 1.7 किमीचे बोगदे या लिंक रोडमुळे पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाचे अंतर 6.5 किमीने कमी होईल. त्यामुळे प्रवासाचा किमान अर्धा तास वाचणार आहे.