राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. यातच पुढील पाच दिवसात अनेक ठिकाणी वातावरणात मोठे बदल झाल्याचं पाहायला मिळू शकतं. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 24 डिसेंबर रोजी राज्यात थंडीचा जोर वाढू शकतो. तसेच पुढील पाच दिवसात अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात घसरण होऊ शकते. मुंबईसह कोकणमध्ये किमान तापमान 17 ते 20 डिग्री सेल्सियस असू शकते. तर खान्देशासह मध्यमहाराष्ट्रात 7 ते 14 तर मराठवाडा आणि विदर्भात 9 ते13 डिग्री सेल्सियस तापमान राहणार आहे.