गगनयानवर देखरेख ठेवण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या बेटावर ISRO उभारणार ट्रॅकिंग स्टेशन

हिंदुस्थानचं गगनयान अंतराळात लवकरच झेपावेल आणि पृथ्वीला फेऱ्या मारेल. या पार्श्वभूमीवर ISRO ने गगनयानवर देखरेख ठेवण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या कोकोस बेटावर नवे ट्रॅकिंग स्टेशन उभारणार आहे. ऑस्ट्रेलियाचे अंतराळ तज्ज्ञ आणि अंतराळ संस्था या कामासाठी मदत करणार आहेत.

ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सी प्रमुख एनरिको पालेर्मोने दिलेल्या एक विदेशी वृत्तपत्राच्या माहितीनुसार हिंदुस्थानी तज्ज्ञांनी या बेटाची पाहणी केली आहे. त्यांनी पाहणी दरम्यान ही जागा ट्रॅकिंग स्टेशनसाठी परिपूर्ण असल्याचे सांगितले. प्रक्षेपणानंतर गगनयानवर नजर ठेवण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या कोकोस बेटावर ट्रॅकिंग बेस उभारणार आहेत. ट्रॅकिंगसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा या बेटावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि या बेटावरून पूर्ण प्रकल्पावर नजर ठेवता येऊ शकते आणि टेलीमेट्री आणि कंट्रोल्सवर नियंत्रण ठेवता येते. यासोबत ऑस्ट्रेलियाच्या स्पेस एजन्सी या मिशनमध्ये हिंदुस्थानसोबत असल्याचे सांगितले. त्याचबरोबर एनरिकोच्या म्हणण्यानुसार ते ISRO एमर्जेन्सी सीनेरियोमध्ये मदत करण्यास तयार आहेत. एनरिको ही गगनयानच्या ट्रॅजेक्टरिवर नजर ठेवेल. आणि कोणतीही समस्या असेल जसे की मिशन अबॉर्ट करणे किंवा क्रू रिकव्हरी असेल तर, ते हिंदुस्थानच्या तज्ज्ञांसोबत असतील.

ऑस्ट्रेलियाच्या समुद्रात हिंदी महासागराचा काही भाग आहे. यामध्ये छोट्या छोट्या 27 बेटांचा समूह आहे. आणि यामधील फक्त पश्चिम बेट आणि होम बेटावर मानवी लोकसंख्या आहे. आणि या बेटांवर 600 लोक राहतात. ज्यामुळे यांना कोकोस मलय संबोधले जाते.

ISRO चे प्रमुख डॉ. सोमनाथ यांनी याबाबत माहिती दिली. पृथ्वीच्या चारही बाजूंनी गगनयानाशी संपर्क साधण्यासाठी ISRO आधी RELAY सॅटेलाइट्स प्रक्षेपित करणार आहेत. आणि हे सॅटेलाइट्स SpaceX च्या फाल्कन रॉकेटने अमेरिकेतून प्रक्षेपित होणार आहे.