तांब्यामधील अॅंटी मायक्रोबियल, अॅंटीऑक्साइड शरीराला अधिक फायद्याचे आहे. तांब्याच्या भांड्यात कमीत कमी आठ तास ठेवलेले पाणी प्यायल्याने शरीरातील अशुद्ध घटक बाहेर टाकून यकृत आणि किडनी निरोगी राहण्यास मदत करते. यामुळे तांब्याच्या भांड्यातून पाणी पिणे शरीरासाठी फायद्याचे असते.
पोट, यकृत आणि मुत्रपिंडाच्या समस्यांसाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी उपयुक्त ठरते. यामध्ये पोटाला, यकृत आणि मुत्रपिंडाला डिटॉक्स करण्याचे गुणधर्म या पाण्यात असते. त्याचबरोबर अल्सर किंवा इन्फेक्शनची समस्या कमी होते. या पाण्यामध्ये बॅक्टेरीयांचा नाश करण्याची प्रभावी क्षमता असते. ज्यामुळे गंभीर रोगांवर मात करण्याची शक्ती निर्माण होते.
आजकाल वजन कमी करण्यासाठी अनेक नवनवीन उपाय केले जातात. पण कमी वेळात वजन कमी करण्यासाठी तांब्याच्या भांड्यातून पाणी प्यावे. ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील अतिरीक्त चरबी कमी करण्यास मदत होते. शिवाय या पाण्याचा पुरेपूर फायदा तेव्हाच होतो जेव्हा ते पाणी आठ तास ठेवेलेले असते.
तांब्यामधील पाणी थायरॉक्सिन हार्मोन्सला संतुलित ठेवते. ज्यामुळे थायरॉइडचा धोका टळतो. त्याचबरोबर तांब्यामधील पाण्यात अॅंटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात जे शरीरातील वेदना आणि सूज कमी करते. आणि शरीरातील युरीक अॅसिड कमी करते. त्यामुळे रोज सकाळी व संध्याकाळी तांब्याच्या भांड्यातील पाणी जरुर प्यावे.