ओठांवरील काळेपणा दूर करण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय ठरतील प्रभावी

हिवाळ्याच ओठ कोरडे पडणे, फाटणे या समस्या जाणवतात. तर काहींचे ओठांचा रंग काळपट दिसू लागतो. याची अनेक कारणे असतात. डिहायड्रेशन, स्वस्त लिपस्टिकचा वापर, धुम्रपान, पाण्याचे कमी सेवन, औषधांचा जास्त वापर यामुळे ओठांचा रंग गडद होतो.जाणून घेऊया घरच्या घरी प्रभावी उपाय.

ओठ काळवंडले असल्यास मधात साखर घालून ओठांना हलका मसाज करा. ओठांवर मृत पेशी जमा झाल्याने ओठांचा रंग काळपट होतो. तो घालविण्यासाठी मध आणि साखर प्रभावी ठरतं. त्यासाठी एका चमच्यामध्ये ब्राऊन शुगर आणि मध घ्यायचे. दोन्ही मिक्स करुन हलक्या हाताने ओठांवर मसाज करावा. स्क्रबमुळे ओठांवरील मृत त्वचा निघून जाईल आणि काळेपणा दूर होण्यास मदत मिळेल.

ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी गुलाबाची पाने दुधासोबत वापरा. दूध आणि गुलाबाच्या पाकळ्या ओठांवर लावल्याने ओठ मऊ आणि गुलाबी दिसतात. त्यासाठी 5-6 गुलाबाची पाने अर्धा कप दुधात रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी ही पाने दुधात गाळून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट ओठांवर लावा आणि ओठांना मसाज करा. याचा वापर ओठांवर केल्याने ओठांचा काळेपणा दूर होतो.

ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी अर्धा चमचा मलईमध्ये थोडी साखर आणि अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळून ओठांवर लावल्याने ओठांचा काळेपणा दूर होईल.