केरळच्या थलासरी न्यायालयाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नऊ स्वयंसेवकांना 19 वर्षांपूर्वीच्या हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 3 ऑक्टोबर 2005 या दिवशी सीपीआय (एम) कार्यकर्ता रिजिथ शंकरन याची हत्या करण्यात आली होती. डाव्या विचारांचा असलेला रिजिथ त्याच्या मित्रांसोबत घरी जात असताना संघाच्या एका जमावाने हल्ला केला, ज्यात सगळे जण जखमी झाले. रिजिथला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. हल्लेखोरांकडे शस्त्रs होती. या प्रकरणी सुधाकरन (57), जयेश (21), रणजीत (44), अजिंदरन (51), अनिलकुमार (52), राजेश (46), श्रीजीत (43), भास्करन (67) आणि श्रीकांत (47) या आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. एकूण 10 आरोपी होते, मात्र एकाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला.