सिगरेटमुळे आरोग्याला धोका निर्माण होतो हे सर्वश्रूत आहे. पण एक सिगारेट प्यायल्याने सरासरी मनुष्याचे आयुष्य 20 मिनिटांनी कमी होते असे नव्या संशोधनातून समोर आले आहे. एक सिगारेट प्यायल्याने सरासरी मानवी जीवन 11 मिनिटांनी कमी होते असे आधी सांगितले जात होते. पण आता युनिव्हर्सिटी ऑफ कॉलेज लंडनने याबाबत नवीन संशोधन केले आहे.
एक सिगरेट प्यायल्याने महिलांचे आयुष्य 17 मिनिटांनी तर पुरुषांचे आयुष्य 22 मिनिटांनी कमी होते. एक सिगारेट प्यायल्याने साधारण मनुष्याचे सरासरी जीवन हे 20 मिनिटांनी कमी होत असल्याचा दावा या संशोधनात करण्यात आला आहे.
जेवढ्या लवकर तुम्ही सिगरेट सोडाल तितके जास्त दिवस तुम्ही जगाल असे संशोधकांनी म्हटले आहे. सिगरेट सोडल्यामुळे शरीराची आरोग्य व्यवस्था तत्काळ सुधारते असेही या संशोधनात म्हटले आहे.
सिगारेट ओढल्याने अनेकांना तारुण्यात काही त्रास जाणवत नाही. पण एकदा साठी ओलांडली तर या संबंधित आजार सुरु होता. एखादा सिगरेट ओढणारा व्यक्ती साठीत असेल तर त्याचे आरोग्य एका सिगारेट न पिणाऱ्या 70 वर्षीय व्यक्तीच्या आरोग्याप्रमाणे असेल असेही संशधकांनी म्हटले आहे.