काळाचौकीतील महारक्तदान शिबिरात, 857 पिशव्या रक्त संकलन

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विधिमंडळ गटनेते अजय चौधरी यांच्या वतीने काळाचौकीच्या शिवाजी विद्यालयात महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तब्बल 857 पिशव्या रक्त संकलन केले.

शिबिरात केईएम, शीव, नायर आणि वाडिया रुग्णालयातील रक्तपेढी सहभागी झाल्या. शिबिराचे उद्घाटन शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, माजी आमदार दगडू सकपाळ यांच्या हस्ते झाले. शिबिराचे नियोजन उपविभागप्रमुख गजानन चव्हाण यांनी केले, तर शिबीर यशस्वी करण्यासाठी शाखाप्रमुख विजय इंदुलकर, किरण तावडे, मिनार नाटाळकर, जयसिंग भोसले, बैजू हिंदोळे यांनी मेहनत घेतली. विभागप्रमुख आशीष चेंबूरकर, माजी महापौर श्रद्धा जाधव, राष्ट्रवादीचे बबन कानावजे, काँग्रेसचे गोरख कांगणे, सपाचे साजिद भाई यांच्यासह माजी नगरसेवक रमाकांत रहाटे, दत्ता पोंगडे, अनिल कोकीळ, सचिन पडवळ, सिंधू मसुरकर, गौरी चौधरी, लता रहाटे, पराग चव्हाण, रूपाली चांदे, दिव्या घाडीगावकर, वैभवी चव्हाण, श्वेता राणे, पवन जाधव, सुप्रित म्हात्रे, श्रुती पोटले, शार्दुल म्हाडगुत आदी उपस्थित होते.