
विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या मतफुटीचा अहवाल लवकरच दिल्लीला पक्षश्रेष्ठीकडे पाठवण्यात येणार असून पक्ष विरोधी कारवाई करण्याची शिफारस प्रदेश काँग्रेसने दिल्लीला पाठवलेल्या अहवालात केल्याचे समजते.
यासंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मागील खेपेस चंद्रकांत हंडोरे ज्यावेळी निवडणुकीला उभे होते, त्यावेळीही हा प्रकार झाला होता. मात्र त्यावेळी त्या लोकांची ओळख पटली नव्हती. म्हणूनच आम्ही या लोकांना जाळ्यात अडकविण्यासाठी काही निर्णय घेतले. त्यात हे बदमाश लोक सापडले आहेत. यासंदर्भात वरिष्ठांना कळविलेले आहे. लवकरच पक्षविरोधी काम करणाऱ्या गद्दार आमदारांना बाहेरचा रस्ता दाखविला जाईल.
तर विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत काही आमदारांनी पक्षाशी बेइमानी केल्याचा आरोप केला आहे.