महिलांच्या पोटावरील चरबी वाढण्याची ‘ही’ आहेत कारणे!

पोटावरील चरबी वाढल्यामुळे महिलांना बरेचदा ओशाळल्यासारखे होते. परंतु आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींमुळेच ही आपली अवस्था झालेली असते हे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळेच पोटावरील चरबी कमी करण्यासाठी अनेकजणी जिम गाठतात. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी केवळ जिम उपयोगी नाही. तर त्या बरोबरीने आपल्या लाईफस्टाईलमध्येही बदल करणे गरजेचे आहे. ओटीपोटावरील चरबी वाढल्यामुळे महिलांना ऊठ बस करण्यासही खूप अडचण येते. तसेच वाढत्या चरबीमुळे शरीरामध्ये इतर आजारांचे प्रमाणही खूप मोठ्या प्रमाणात वाढण्यास सुरुवात होते.

शरीरावरील चरबीचे वाढते प्रमाण यामुळे डिप्रेशन सारख्या अनेक आजारांना सामोरे जावे लागते. चरबीचे दोन मुख्य प्रकार आहेत, व्हिसेरल आणि त्वचेखालील. व्हिसरल म्हणजे यकृत आणि उदराच्या इतर अवयवांच्या सभोवतालची चरबी. व्हिसेरल फॅटचे प्रमाण जास्त असल्याने मेटाबॉलिक सिंड्रोम, टाइप 2 मधुमेह, हृदयरोग आणि काही प्रकारचे कर्करोग यांसारख्या जुनाट आजारांचा धोका वाढतो. तुम्ही देखील पोटाच्या चरबीने त्रस्त असाल आणि चरबी कमी होण्यासाठी प्रयत्नशील असाल तर काही गोष्टींचा समतोल राखणे हे खूप गरजेचे आहे.

तळलेल्या पदार्थांचे अतिरिक्त सेवन हे चरबी वाढण्यास जबाबदार असते. तळलेले अन्नपदार्थ पचनास जड असल्यामुळे, चरबी वेगाने वाढते. त्या जोडीला जंक फूडचे सेवनही चरबी वाढण्यास प्रमुख कारणीभूत घटक आहे. ताणतणावामुळेही हार्मोन्समध्ये बदल होऊन पोटाच्या खालील भागात चरबी जमा होते. एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, झोपेच्या कमतरतेमुळे पोटावरील चरबी वाढते. तसेच जंक फूडचा आहारातील समावेश हेही चरबी वाढण्याचे प्रमुख कारण आहे.

 

(कोणतेही उपाय करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)