राहुल गांधी उद्या मणिपूर दौऱ्यावर

गेल्या वर्षभरापासून पेटत असलेल्या मणिपूरकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत असताना लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सोमवारी मणिपूरला भेट देणार आहेत. यावेळी मदत छावण्यांना भेट आणि नागरिकांशी संवाद साधत तिथल्या परिस्थितीचा आढावा ते घेणार आहेत. राहुल गांधी सोमवारी विमानाने दिल्लीहून सिलचरला पोहोचतील. तिथून ते जिरिबामला भेट देतील. या जिह्यात 6 जूनला हिंसाचाराची घटना घडली होती.