हॉटेल मालकाकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुरुग्राम पोलिसांनी गँगस्टर कौशल चौधरीची पत्नी आणि कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईची कट्टर दुश्मन मनीषा चौधरीला अटक केली आहे. मनीषा तुरुंगात असलेल्या पतीच्या इशाराऱ्यावरून परदेशात असलेल्या सौरभ गाडौली या भावासोबत मिळून गँग चालवत होती. आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी तिने हॉटेल व्यावसायिकाकडून खंडणी मागतानाच हॉटेलवर गोळीबारही करवला होता. मनीषावर 6 गुन्हे दाखल असून सध्या ती जामिनावर होती.