गर्लफ्रेंडच्या शॉपिंगसाठी लॉ शिकणारा विद्यार्थी झाला चोर

आपल्या गर्लफ्रेंडचा शॉपिंगचा हट्ट पूर्ण करण्यासाठी आणि तिला महागडा आयफोन घेऊन देण्यासाठी लॉचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याला चोरी करावी लागल्याची घटना उत्तर प्रदेशात उघडकीस आली आहे. गर्लफ्रेंडचा हट्ट पूर्ण करण्यासाठी अनेक घरांमध्ये त्याने चोरी केल्याचे कबूल केले आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्या विद्यार्थ्याला अटक केली आहे.

उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये हा विद्यार्थी कायद्याचे (लॉ)चे शिक्षण घेत होता. अब्दुल हलीम असे आरोपीचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील जौनपूरचा रहिवासी आहे. गर्लफ्रेंला खूश करण्यासाठी आणि तिचा हट्ट पूर्ण करण्यासाठी चोरी केल्याची कबुली अब्दुलने पोलिसांना दिली. एका आठवड्याच्या कालावधीत त्याने परिसरातील तीन घरांमध्ये चोरी केल्याची माहितीही सांगितली.

मैत्रिणीला मॉलमध्ये शॉपिंग करायला आवडतं. तसेच आयफोन खरेदी करणे, महागड्या क्लबमध्ये जाणे, मित्रमैत्रिणींसोबत चित्रपट पाहायला जाणे यासाठी तो आपल्या मैत्रिणीच्या या गोष्टी पूर्ण करण्यासाठी घरात जाऊन चोरी करायचा.