वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे विधी महाविद्यालय आणि मुंबई उपनगर जिल्हा विधी सेवा प्राधीकरण, यांनी एकत्रितरित्या जनजागृती केली. “कायदे आणि मूलभूत अधिकारांची जनजागृती” हा कार्यक्रम चेंबूरच्या समर्थनगरमध्ये घेण्यात आला. या कार्यक्रमाला स्थानिकांनी चांगला प्रतिसाद दिला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सहायक प्राध्यापक सचिन बोटे, सहायक प्राध्यापक गोवर्धन, सहायक प्राध्यापिका स्मिता सोनावणे आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. स्थानिक रहिवाशींना त्यांच्या कायदेशीर मूलभूत अधिकारांची माहिती देण्यात आली. वसंतदादा पाटील प्रतिष्ठान विधी महाविद्यालयाचे जनरल सेक्रेटरी अॅड. अप्पासाहेब देसाई यांच्या संकल्पनेतून समाजातील वंचित घटकांना मदत करण्यासाठी महाविद्यालयात “मोफत कायदे सल्ला आणि सहायता केंद्र” सुरू करण्यात आलं आहे.