जर्मनीतील दोन वर्षांच्या लॉरेंट श्वार्ज या चिमुरडय़ाने कलाविश्वात कमाल केली आहे. लॉरेंटने पिकासो स्टाईलचे अॅबस्ट्रक्ट पेंटिंग काढले आहे. एवढेच नव्हे तर या पेंटिंगची सात हजार डॉलरमध्ये विक्री झाली आहे. लॉरेंटचा कला प्रवास वयाच्या दुसऱया वर्षी सुरू झालाय. गेल्या वर्षी तो पालकांसोबत एका रिसॉर्टवर गेला होता. तिथल्या ऑक्टिविटी रूममध्ये तो चांगलाच रमला. तिथून घरी परतल्यावर लॉरेंटच्या पालकांनी त्याच्यासाठी आर्ट स्टुडिओ तयार केला. आर्ट स्टुडिओत हा चिमुरडा आता चित्रे काढतो. त्याने हत्ती, डायनासोर, घोडे या प्राण्यांचे अॅबस्ट्रक्ट पेंटिंग केलेय. गडद रंगाचा वापर करून त्याने पेंटिंग रंगवले आहे. एवढय़ा लहान वयात त्याला रंगसंगतीची चांगली जाण असल्याचे त्याची आई लिसाने सांगितले. एप्रिल महिन्यात म्युनिच येथे झालेल्या आर्ट फेअरमध्ये लॉरेंटच्या कलेने साऱयांनाच चकित केले.