प्रेम झालं नाही लादलं गेलं….नॅशनल टिव्हीवर पती विकी जैनच्या वक्तव्याने अंकिता लोखंडेने व्यक्त केले आश्चर्य

कलर्स टीव्हीवरील ‘लाफ्टर शेफ्स’ हा शो सध्या खूप चर्चेत आहे. या शोमध्ये स्वयंपाकाबरोबरच खूप धमालमस्तीही पाहायला मिळते. या शोमध्ये प्रसिद्ध टीव्ही कलाकार दिसत आहेत. सध्या या शोचा एक नवीन प्रोमो चर्चेत आला आहे. या प्रोमोमध्ये, विकी जैनने नॅशनल टेलिव्हिजनवर अंकिता लोखंडेवरील त्याच्या प्रेमाबद्दल असे काही सांगितले की, ते ऐकल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरील भाव पाहण्यासारखे होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

कलर्स टीव्हीने ‘लाफ्टर शेफ्स’ चा एक नवीन प्रोमो रिलीज केला आहे. या प्रोमोमध्ये शोचे सर्व स्पर्धक एकमेकांसोबत मजा करताना दिसत आहेत. दरम्यान त्या प्रोमोमध्ये भारती सिंग प्रेमाशी संबंधित एक प्रश्न विचारते. ती म्हणते प्रेम म्हणजे काय? यावर उत्तर देताना अंकिता लोखंडे म्हणते, ‘प्रेम ही एक सुंदर गोष्ट आहे, ज्यामध्ये भांडणे देखील असतात.’ अंकिताचे बोलणे ऐकून मनारा चोप्रा मात्र आनंदाने हसायला लागते. त्यानंतर अंकिताचे बोलणे ऐकून कृष्णा अभिषेक म्हणाला, ‘तू एक चूकीचे बोललीस की प्रेमात भांडणे होतात, पण प्रत्यक्षात फक्त भांडणेच होतात.’ हे ऐकल्यानंतर सर्वांनाच हसू अनावर झाले. त्यानंतर विकी जैन, अंकिताकडे पाहत म्हणतो, ‘मला वाटतं हे प्रेम झाले नाही, कदाचित ते लादलं गेलं असेल.’ विकी त्यावर खूप हसतो, पण अंकिता त्याच्याकडे कटाक्ष टाकत आश्चर्याने पाहते. विकी अंकिता व्यतिरिक्त, या शोमध्ये अभिषेक कुमार, समर्थ जुरैल, रुबिना दिलाइक, मन्नारा चोप्रा असे नवीन चेहरे दिसत आहेत.