
लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअतंर्गत लातूर जिल्ह्यातील लपून-छपून हातभट्टी तयार करणाऱ्या ठिकाणांवर कारवाई करत हातभट्टी दारू तयार करणारे, देशी-विदेशी दारूची अवैध विक्री व्यवसाय करणाऱ्या 83 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून 5 लाख 21 हजार 220 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच हातभट्टीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.
अवैध धंद्यावर कार्यवाही करण्यासाठी 32 पोलीस अधिकारी, 118 पोलीस अमलदारांचे विशेष पथके बनवून मोहिम राबविण्यात आली. मासरेडमध्ये लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील दुर्गम भागात लपून- छपून हातभट्टी तयार करून त्याची साठवणूक व विक्री करणाऱ्यांवर, तसेच देशी-विदेशी मद्याची अवैद्य विक्री व्यवसाय करणाऱ्या 83 इसमांवर 83 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये हातभट्टी, हातभट्टीचे रसायन, हजारो लिटर देशी व विदेशी दारू असा एकूण 05 लाख 21 हजार 220 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच हजारो लिटर हातभट्टी दारू व हातभट्टीचे रसायन नष्ट करण्यात आले आहे.