अहमदपूर तालुक्यातील एका गावामधील दोन तरुणांनी एका अल्पवयीन मुलीला रात्री आठ वाजता मोबाईल फोन करून घराबाहेर बोलवलं. त्यानंतर गावा बाहेरील पुलावर घेऊन जाऊन वाईट हेतुने स्पर्श केला असल्याची घटना 6 सप्टेंबर रोजी घडली. दरम्यान या प्रकरणी अहमदपूर पोलिसात दोन तरुणांविरुद्ध बाल लैगिक प्रतिबंध कायदा पोस्को अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याविषयी पोलीस सूत्रांनी माहिती दिली त्यानुसार अहमदपूर तालुक्यातील एका गावात गावातील दोन तरुणांनी 6 सप्टेंबर रोजी गावातीलच एका अल्पवयीन मुलीला रात्री आठ वाजता मोबाईलवर फोन करून घराबाहेर बोलावुन घेतले व मोटार सायकलवर बसवुन गावाबाहेर असलेल्या एका पुलावर घेऊन गेले. त्यातील एकाने मी तुझ्यावर प्रेम करतो तू माझ्या सोबत चल म्हणाला असता मुलीने नकार देताच वाईट हेतूने मुलीच्या हाताला धरून जवळ ओढले. मुलीने नकार देताच मुलीच्या गालावर चापटा मारून जिवे मारण्याची धमकी दिली तेव्हा मुलगी म्हणाली मला घरी नेऊन सोड नाही तर मी आरडा ओरडा करेल. तेव्हा मुलीचं रौद्र रुप आणि स्पष्ट मत त्याने व त्याच्या मित्राने त्या मुलीला घरी नेऊन सोडले. हा घडलेला सगळा प्रकार मुलीच्या आजोबांना कळला असता जाब विचारण्यासाठी गेलेल्या आजोबांना तरुणांनी जिवे मारण्याची धमकी दिली. अल्पवयीन पीडितेने दिलेल्या फिर्यादी वरून अहमदपूर पोलिसांत दोन तरुणाविरूद्ध भारतीय न्याय दंड संहिता कलम 74, 352 ,351 व बाल लैंगिक प्रतिबंध कायदा पोस्को अंतर्गत 2012 ,8/ 12 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक ए एन श्रीमंगले हे करत आहेत.