लातूर महापालिका आयुक्तांनी स्वत:वर गोळी झाडून घेतली; डोक्याची कवटी फोडून गोळी आरपार, प्रकृती चिंताजनक

लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी शनिवारी रात्री स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. रात्री सव्वा अकराच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

बाबासाहेब मनोहरे यांनी शासकीय बंगल्यावर शनिवारी रात्री सव्वा अकराच्या सुमारास रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून घेतली. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळते. त्यांच्यावर लातूर येथील सह्याद्री रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शासकिय कामकाज संपल्यानंतर बाबासाहेब मनोहरे यांनी शनिवारी रात्री नेहमीप्रमाणए कुटुंबीयांसोबत जेवणे घेतले. त्यांच्यासोबत गप्पा मारल्या. यानंतर ते खोलीत गेले आणि रिव्हॉल्व्हरमधून त्यांनी स्वत:वर गोळी झाडून घेतली. गोळीचा आवाज ऐकून कुटुंबीय खोलीत गेले त्यावेळी बाबासाहेब मनोहरे हे रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

बाबासाहेब मनोहर यांच्या डोक्यातून गोळी आरपार केली आहे. कवटी फुटून गोळी उजव्या बाजूने आरपार गेली. यात त्यांच्या मेंदूच्या काही भागालाही इजा पोहोची आहे. तुटलेल्या कवडीचे काही तुकडेही त्यांच्या मेंदूत पसरले आहेत, अशी माहिती सह्याद्री हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर हनुमंत किनीकर यांनी दिली.

दरम्यान, बाबासाहेब मनोहरे यांची प्रकृती चिंताजनक आहे. डॉक्टर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणार होते. मात्र याबाबत अधिक माहिती मिळालेली नाही.