विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी महायुतीने राज्यातील महिलांना 1500 रुपयांचे आमिष दाखवून लाडकी बहीण बनवले. मात्र लाडक्या बहिणींना पैसे देताना खिसा रिकामा झाल्याने आता लाडक्या देवाभाऊंनी याच बहिणी सावत्र ठरवल्या आहेत! लातूर जिल्हय़ात एका फटक्यात 25 हजार लाडक्या बहिणींचे अर्ज बाद करण्यात आले. या बहिणींना आठवा हप्ता मिळणार नसल्याचे सांगितले गेले.