अर्थवृत्त: एमजी मोटरची आरएक्स 9 लाँच, स्कोडाची स्वस्त कायलाक आली

स्कोडाने आपली सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही कायलाक कार लॉन्च केली. स्वस्तात मस्त असलेल्या या कारची सुरुवातीची किंमत केवळ 7.89 लाख रुपये आहे. या कारची बुकिंग येत्या 2 डिसेंबरपासून सुरू होईल. तर डिलिव्हरी पुढील वर्षी 27 जानेवारी 2025पासून केली जाणार आहे. सब-4 मीटर एसयूव्ही चार प्रकारांमध्ये सादर करण्यात आली आहे. यामध्ये क्लासिक, सिग्नेचर, सिग्नेचर प्लस आणि प्रेस्टीजचा समावेश आहे.

फोक्सवेगनची ऑफर

फोक्सवेगन कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी द बिग रूश ऑफर आणली आहे. ही ऑफर 9 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर 2024पर्यंत असणार आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना एकापेक्षा एक भन्नाट ऑफर दिल्या जाणार आहेत, अशी माहिती ब्रँड संचालक आशीष गुप्ता यांनी दिली.

एमजी मोटरची आरएक्स 9 लाँच

एमजी मोटरने एमजी आरएक्स9 प्रीमियम एसयूव्हीला जेदाह इंटरनॅशनल मोटर शोमध्ये सादर केले. या कारमध्ये जबरदस्त अत्याधुनिक टेक्नोलॉजी, पॉवरफूल परफॉर्मन्स, खास डिझाईन दिली आहे. या कारला एन्ट्री लेवल एसटीडी 2.0 टर्बो, मिड टायर कॉम 2.0 टर्बो आणि टॉप टायर लक्स 2.0 टर्बो या तीन वेगवेगळ्या प्रकारात आणले आहे. या कारची सुरुवातीची किंमत 26 हजार डॉलर इतकी ठेवण्यात आली आहे.

टाटा इनोव्हेशन फंड

टाटा असेट मॅनेजमेंटने शुक्रवारी टाटा इंडिया इनोव्हेशन फंड लाँच केला. या वेळी टाटा असेट मॅनेजमेंटचे मुख्य व्यवसाय अधिकारी आनंद वरदराजन, चीफ इन्व्हेस्टमेंट अधिकारी राहुल सिंग उपस्थित होते. हा फंड 11 नोव्हेंबर 2024 रोजी उघडणार आहे. या फंडाकडे अनेकांचे लक्ष लागले होते.

सिट्रोएनचे एक्सप्लोर एडिशन

सिट्रोएन इंडियाने बाजारात आपली प्रसिद्ध एसय्व्ही सिट्रोएन एअरक्रॉसचे एक्सक्लसिव्ह एक्सप्लोर एडिशन लाँच केले. हे लिमिटेड एडिशन आहे. या कारची किंमत 8.49 लाख रुपये आहे. सिट्रोएन एअरक्रॉसच्या प्लस आणि मॅक्स ट्रिममधील एक्सप्लोर एडिशनला सादर केले असून यात स्टँडर्ड पॅकची किंमत 24 हजार रुपये आणि ऑप्शनल पॅकची किंमत 51,700 रुपये आहे.

प्रोफेक्टस कॅपिटल

प्रोफेक्टस कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने कॉन्व्हर्टिबल डिबेंचर्स (एनसीडी) जारी करून 205 कोटी रुपयांचा निधी उभारला आहे, अशी माहिती प्रोफेक्टस कॅपिटलचे संस्थापक, सीईओ आणि पूर्णवेळ संचालक के.व्ही. श्रीनिवासन यांनी दिली. आयएफसीसोबत भागीदारी केल्याचा आम्हाला आनंद झाला आहे, असेही ते या वेळी म्हणाले.

करिष्माची नवी अगरबत्ती बाजारात

बंगळुरू येथील करिष्मा प्रोडक्ट्सची नवी अगरबत्ती वास्तूयंत्र आणि प्युअर हिना मसाला अगरबत्ती बाजारात दाखल झाली आहे. ही अगरबत्ती नैसर्गिक वनस्पतीपासून तयार केल्या आहेत. या अगरबत्तीला नैसर्गिक सुगंध आहे. ही अगरबत्ती 50 ग्रॅम, 100 ग्रॅम आणि 250 ग्रॅमच्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे. कंपनीच्या अगरबत्त्या विविध प्रकारांमध्ये उपलब्ध आहेत. बंगळुरू कंपनीचा लोगो पाहूनच अगरबत्ती खरेदी करावी. अधिक माहितीसाठी संपर्क – 9343834805