
महायुतीला विधानसभेला मिळालेल्या यशावर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. सत्ताधाऱयांनी ईव्हीएममध्ये घोळ करून ही निवडणूक जिंकल्याचा संशय व्यक्त होत आहे. वंचित बहुजन आघाडीनेही ईव्हीएमविरोधात स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. त्याचबरोबर मतदानाच्या उशिरा जाहीर झालेल्या संशयास्पद आकडेवारीवरून निवडणूक आयोगाला पत्राद्वारे तीन प्रश्न विचारले आहेत. रात्री 10 पर्यंत 75,97,067 मतांची वाढ कशी झाली, असा सवाल अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी हे सांगतील का?
1) मतदाराला मत देण्यासाठी लागणारा वेळ
2) जिल्हा निवडणूक अधिकारी/रिटार्ंनग अधिकारी आणि पर्यवेक्षक यांनी 20 नोव्हेंबर रोजी सायं. 5 ते 6 वेळेतील मतांची नोंद केली आहे का? तशी नोंद झाली असल्यास त्याचा तपशील देणे
3) 20 नोव्हेंबर रोजी सायं. 5.59 वाजता रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना जारी केलेल्या टोकनची संख्या नोंदवली आहे का? नोंदवली असल्यास त्याचा तपशील द्यावा.