अकरावीच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज करण्याची आज शेवटची संधी; सोमवारी होणार गुणवत्ता यादी

अकरावी ऑनलाइन प्रवेशांच्या तिसऱ्या फेरीसाठी अर्ज करण्याची तसेच पसंतीक्रम बदलण्यासाठी उद्या 17 जुलै शेवटची संधी आहे. या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर केली जाणार आहे. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना 22 ते 24 जुलैदरम्यान प्रवेश घेता येणार आहेत.

मुंबईत 1 हजार 47 महाविद्यालयात सर्व कोटय़ातील मिळून 4 लाख जागा आहेत. त्या जागावर आतापर्यंत 2 लाख 86 हजार 747 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. तर यापैकी 1 लाख 13 हजार विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतले आहेत. हे प्रमाण केवळ 39.7 टक्के इतके आहे. तर 2 लाख 87 हजार 116 जागा अजूनही रिकाम्या आहेत. ही टक्केवारी 71.61 टक्के इतकी आहे, तर 1 लाख 72 हजार 898 विद्यार्थी अजूनही अर्ज करून प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. आतापर्यंत एक शून्य फेरी आणि दोन नियमित फेऱया पार पडल्या असून प्रवेशासाठीची तिसरी फेरी सुरू आहे. या फेरीत अर्ज करण्यासाठी आज अखेरचा दिवस आहे.

अशी होणार तिसरी फेरी
– अर्ज करणे, पसंतीक्रम बदल : 17 जुलै
– गुणवत्ता यादी तयार करणे; तसेच डेटा प्रोसेसिंग : 18 ते 19 जुलै
– गुणवत्ता यादी : 22 जुलै सकाळी 10 वाजता.
– प्रवेश निश्चित शुल्कांद्वारे प्रवेश घेणे : 22 ते 24 जुलै (सायंकाळी 6 वाजता)
– महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची माहिती अपलोड करणे : 25 जुलै रात्री 8 पर्यंत.

आतापर्यंतची अकरावीची आकडेवारी
– महाविद्यालय : 104
– एकूण जागा : 400965
– आतापर्यंतची एकूण नोंदणी : 286747
– प्रवेश घेतेलेले : 1,13,849 (39.7 %)
– शिल्लक जागा : 2,87,116 (71.61 %)
– प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेले : 1,72,898