
लश्कर ए तैय्यबाच्या मौलाना काशिफ अलीची त्याच्या राहत्या घरी गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. त्याच्या हत्येनंतर पाकिस्तानमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
मौलाना काशिफ अली हा लश्कर ए तैय्यबाची राजकीय शाखा पाकिस्तानी मरकझी मुस्लमी लीग चालवत होता. काशिफ अली पाकिस्तनाच्या खैबर पख्तुन्वा भागात राहत होता. हा पक्ष लश्कर ए तोयबाचा म्होरक्या हाफिझ सईदने स्थापन केला होता. मिळालेल्या माहितीनुसार काशिफ अलीच्या राहत्या घरी त्याच्या डोक्यात गोळी घालून त्याची हत्या करण्यात आली. काशिफ अलीवर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पळून गेले. त्यानंतर काशिफ अलीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. काशिफ अलीच्या मृत्यूमुळे पाकिस्तानात हळहळ व्यक केली जात आहे.