
एअर इंडियाचे 5 मार्च रोजी शिकागोवरून ग्रीनलँडला जाणाऱ्या विमानातील सर्व टॉयलेट तुंबल्यामुळे हे विमान पुन्हा शिकागोला उतरविण्यात आले होते. तब्बल पाच तासाच्या प्रवासानंतर हे विमान पुन्हा शिकागोला वळविण्यात आल्याने प्रवासी वैतागले. सध्या त्यावरून एअर इंडियाच्या सेवेवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. मात्र प्रत्यक्षात एअर इंडियाने जेव्हा त्या तुंबलेल्या टॉयेलटच्या ड्रेनेज लाईनची दुरुस्ती केली तेव्हा त्यातून धक्कादायक गोष्टी बाहेर आल्या. या ड्रेनेज लाईनमधून चक्क चिंध्या, कापडाचे मोठे तुकडे, प्लास्टिकच्या पिशव्या बाहेर आल्या. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
5 मार्च रोजी एअर इंडियाचे बोईंग 777 हे विमान शिकागोवरून 300 प्रवाशांना घेऊन ग्रीनलँडला जात होते. मात्र काही तासाच्या प्रवासानंतर विमानातील बाराही टॉयलेट तुंबल्याचे लक्षात आले त्यानंतर एअर इंडियाने ते विमान पुन्हा शिकागोला परत नेले. त्यानंतर प्रवाशांना नुकसान भरपाई देऊन त्यांच्या राहण्याची सोय देखील एअर इंडियाने केली होती. त